चंद्रपूरसारख्या शहरात वायू प्रदूषण दिवसेंदिवस वाढतच चालले आहे आणि यावर अद्यापही तोडगा निघालेला नाही. लोकांनी पुढाकार घेवून याबाबत सरकार व उद्योगांशी संवाद साधावा आणि सामान्य माणसाचा आवाज या लोकांपुढे मांडावा, असा विचार काही विद्वान मांडतात. याच विचाराला धरून महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने ‘स्टार रेटिंग’ कार्यक्रमास मागच्या वर्षी सुरुवात केली होती. शहरात तर वायु प्रदूषण नियंत्रणाबाबत खूप कार्यक्रम होत राहतात. पण स्टार रेटिंगसारखा उपक्रम, उद्योगांच्या सावलीत राहणाऱ्या चंद्रपूर शहरात कसा वापरला जाऊ शकतो, याबाबत ग्रीन प्लॅनेट सोसायटी व शिकागो विद्यापीठाच्या एपिक-इंडिया या संस्थेने बजाज पॉलिटेक्निक महाविद्यालयात एक चर्चासत्र आयोजित केले होते…